पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नच बलिये'च्या सेटवर रविना- मनिषमध्ये वाद, तासभर चित्रीकरण रखडले

रविना - मनिषमध्ये वाद

'नच बलिये ९' च्या सेटवर परीक्षक रवीना टंडन आणि  सुत्रसंचालक मनिष पॉलमध्ये वाद झाला. गैरसमजातून झालेल्या  वादामुळे एक तास चित्रीकरणाचा खेळ खंडोबा झाला. अखेर प्रोडक्शननं दोघांची  मनधरणी करून चित्रीकरण पुन्हा सुरू केलं. 

'अभिनेता होण्यासाठी वडिलांनी धक्के मारून घराबाहेर काढलं होतं'

रविना समोर असताना मनिषनं तोंड मुरडलं, मनिषनं आपल्याला पाहूनच तोंड मुरडलं असा रविनाचा गैरसमज झाला. यावरून मनिष आणि रविनामध्ये वाद झाला. ती सेटवरून तडक निघून आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. त्यानंतर मनिषही सेटवरून निघून गेला. सुत्र संचालक आणि परीक्षक दोघंही नसल्यानं जवळपास १ तास 'नच बलिये'चं चित्रीकरण थांबून होतं. 

'गर्ल्स' आणि 'फत्तेशिकस्त' मधली टक्कर टळली

अखेर दोघांची मनधरणी करून चित्रीकरणाला सुरूवात करण्यात आली असंही सेटवर उपस्थित असलेल्या सुत्रांनी सांगितलं.