पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नच बलिये'मध्ये सलमाननं आणला सर्वात मोठा ट्विस्ट

सलमान खान

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या 'नच बलिये'च्या नव्या सिझनची निर्मिती सलमान खान करत आहे. या शोच्या मूळ संकल्पनेत मोठा बदल करण्याचा निर्णय सलमाननं  घेतला आहे. 'नच बलिये'मध्ये खऱ्या आयुष्यातील जोडपी सहभागी होतात. मात्र यंदा आतापर्यंत सुरू असलेल्या शोपेक्षा खूपच वेगळा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. 

शाहिद म्हणतो, प्रियांकानं लग्नाला बोलावलं पण करिनानं नाही

या शोमध्ये आता पूर्वाश्रमीच्या जोड्या पहायला मिळणार आहे. म्हणजे जी जोडपी आता एकत्र नाहीत, ज्यांचं ब्रेकअप किंवा घटस्फोट झालाय अशा जोड्या आता 'नच बलिये'मध्ये पहायला मिळणार असल्याचं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे. सलमाननं  या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'इंशाअल्लाह' टक्कर टळली, 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

यावेळी  'नच बलिये'ला मनोरंजनाचा तडका मिळणार आहे. पूर्वाश्रमीच्या जोड्यांना एकत्र पहायला लोकांना नक्की आवडेल अशीही प्रतिक्रिया सुत्रानं दिली.  याआधी सलमाननं द कपिल शर्मा शोची निर्मिती केली होती.