पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला दिवसाला खर्चासाठी २० रुपये मिळायचे- विकी

विकी कौशल

'उरी द सर्जिकल स्ट्राईक्स'च्या यशानंतर अभिनेता विकी कौशल चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला आहे. २०१९ मधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत विकी अव्वल आहे. विकी त्याच्या खऱ्या आयुष्यात नेमका कसा आहे हे जाणून घेण्यास त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत. विकीनं हिंदुस्थान टाइम्स ब्रंचला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याच्या स्वभावाचे अनेक पदर उलगडले आहेत. विशेष म्हणजे  बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.

'दी लायन किंग' ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हॉलिवूड चित्रपट

माझा जन्म चाळीत झाला.  एका छोट्या खोलीत मी राहायचो. गरज आणि चैन यामधला नेमका फरक मला माझ्या पालकांनी शिकवला. परिस्थीतीची जाणीव मला करून दिली. कॉलेजला जाताना मी बसऐवजी चुकून रिक्षा केली तरी मला जाब विचारला जायचा. मला दिवसाला २० रुपये खर्चाला मिळायचे. म्हणजे महिन्याला माझा पॉकेटमनी हा ६०० रुपये होता. मला माझ्या पालकांनी काटकसर शिकवली. 

रुपाली फक्त माणसांचा वापर करते, वैशालीचं रोखठोक मत

आजही मी आईला दुकानातून सामान आणून देतो. घरी येताना  आई अनेकदा मला पनीर घेऊन ये, धान्य, दूध, दही घेऊन ये असे आदेश देते. मी ते घेऊनही येतो फक्त फरक इतकाच आहे की आता मी कारनं सामान आणायला जातो, विकी म्हणाला.