पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'

मिशन मंगल

अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश असलेला 'मिशन मंगल'  चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँचला अक्षय कुमारसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. या चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे असं अक्षय म्हणाला. भारताच्या मंगलयान मोहिमेचा खर्च हा माझ्या चित्रपटाच्या एकूण बजेटपेक्षाही कमी होता अशा शब्दात अक्षयनं कौतुक केलं. 

अक्षय-प्रभास टक्कर टळली, 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

'२.० या चित्रपटाचं एकूण बजेट हे ५०० कोटी होतं.  मात्र मंगलयान मोहीमेचा खर्च हा केवळ ४५० कोटी रुपये होता. या मोहिमेसाठी अमेरिकेनं ६ हजार कोटी खर्च केले होते', असं अक्षय म्हणाला असल्याची माहिती 'दी इंडियन एक्स्प्रेस'नं दिली. 

'आम्हाला सुरूवातीला मार्स ऑरबिटर मिशनबद्दल फारशी माहिती नव्हती मात्र या चित्रपटात काम करताना आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या', असंही अक्षय म्हणाला. जगन शक्ती यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.