पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Mumbai Saga : कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार जॉन

जॉन अब्राहम

 अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका असलेल्या 'मुंबई सागा' या चित्रपटातला अभिनेता जॉन अब्राहमचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम आतापर्यंत कधीही न पहिलेल्या अवतारात दिसणार आहे. 

कुडता पायजमा आणि माथ्यावर  टिळा लावलेल्या जॉनचा फर्स्ट लूक सर्वांचं लक्ष वेधत आहे. यापूर्वी जॉननं गँगस्टरची भूमिका साकरली आहे, मात्र ही भूमिका नक्कीच वरचढ असणार असा विश्वास दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची कमाल, ६० कोटींची कमाई; 'छपाक' खूप मागे

'मुंबई सागा' हा चित्रपट ८० च्या दशकातील गुन्हेगारी विश्वावर आधारलेला आहे. ही अंडरवर्ल्ड मधली सत्य घटना असल्याचंही म्हटलं जात आहे. इम्रान हाश्मी, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, प्रतिक बब्बर, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. १९ जुलैला प्रदर्शित होणारा  हा चित्रपट दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट मानला जातो. 

यापूर्वी संजय गुप्ता यांनी 'शूटआउट अॅट वडाला' आणि 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' यांसारख्या अंडरवर्ल्डवर आधारीत चित्रपटांचं दिग्दर्शक केलं होतं. २५ वर्षांची कारकीर्द आणि १७ चित्रपटांनंतर मी माझ्या प्रेक्षकांना मोठी आणि सर्वोत्तम भेट देणार आहे असं संजय गुप्ता म्हणाले होते.

Happy Birthday: हरहुन्नरी, प्रतिथयश अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता