पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काही चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही जातात, मंत्र्याची दीपिकावर टीका

दीपिका पादुकोन

जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या भेटीमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोन चर्चेत आहे. दिल्लीत 'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेलेल्या दीपिकानं मंगळवारी रात्री जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. दीपिकानं विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयषी घोष आणि इतर विद्यार्थ्यांची भेट घेतली मात्र उपस्थितांना संबोधित न करता दीपिका निघून गेली. दीपिकावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे. 

'कोण कुठे जाईल यावर कोणीही  निर्बंध आणू शकत नाही. हा एक लोकशाही असलेला देश आहे त्यामुळे आम्हाला यावर कोणताही आक्षेप नाही.  काहीजण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जातात  तर काही  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी असा इव्हेंट तयार करतात' अशी टीका नक्वी  यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केली आहे.

मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षांत गश्मीर- पूजाचा 'बोनस'

दीपिका जेएनयूत गेल्यानंतर तिच्या भूमिकेवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ती  प्रमोशनचा भाग म्हणूनच जेएनयूत गेली होती असं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र दीपिकाच्या समर्थनार्थ बॉलिवूड पुढे आलं आहे. तिनं घेतलेल्या धाडसी भूमिकेचं बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी समर्थन केलं आहे.

काय म्हणाली दीपिका
 जे काही सुरू आहे त्याची मला चीड आहे  वाईट म्हणजे अद्यापही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मला याचं खूप दु:ख होत आहे. अशाप्रकारच्या गोष्टी देशात नित्याच्या भाग होऊ नये इतकंच मला वाटतं. कोणीही उठतं काहीही बोलतं, काहीही करतं. याची मला भीती वाटू लागलीये. हा आपल्या देशाचा पाया नाही असं दीपिका म्हणाली.

करणनं 'तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये केली कपात?