पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तर मराठी चित्रपट चालणार कसे? मृण्मयीचा प्रश्न

मन फकीरा चित्रपटाची टीम

मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबल्या जातात. मुंबईत विलेपार्ले आणि अंधेरी येथे तसेच पुणे येथील गुडलक हॉटेल, डेक्कन जिमखाना येथे अभिनेत्री व दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, सुव्रत जोशी, सायली संजीव या कलाकारांनी हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरत रसिकांना चित्रपटगृहाकडे यायचे आवाहन केले तेव्हा सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली. 

मराठी लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच नाही तर मराठी चित्रपट चालणार कसा? आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तुमच्याकडे आलोय तुम्ही थिएटरमध्ये तरी या, असा  'मन फकीरा' चित्रपटाची  दिग्दर्शिका मृण्यमयीच्या हातात असलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं.  मन फकीरा या चित्रपटाबद्दलची त्यांची आत्मीयता त्यांच्या या कृतीतून झळकत होती. 

VIDEO : सूर्यवंशीचा 'Power-packed' ट्रेलर पाहिलात का?

“मराठी चित्रपटसृष्टीत आज नवनवीन प्रयोग होत आहेत. प्रेक्षकही त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहे. माझ्या भूमिका असलेल्या चित्रपटांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. पण माध्यमांच्या भडीमारामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची सवय कमी होते की काय, अशी भिती वाटत आहे. मराठी चित्रपटाचा प्रेक्षक चित्रपटगृहाकडे यावा आणि आमच्या वेगळ्या प्रयत्नाला त्याने पाठबळ द्यावे, म्हणून आम्ही हा ‘हटके’ मार्ग अवलंबला,” असं मृण्मयी म्हणाली. 

रविवारी १ मार्च रोजी विलेपार्ले आणि अंधेरी येथे आणि सोमवारी २ मार्च २०२० रोजी गुडलक हॉटेलजवळ, डेक्कन जिमखाना येथे ही मंडळी  फलक घेऊन उभे असलेली पाहायला मिळाली. मृण्मयी दिग्दर्शित या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. 

'स्टारकिड्समुळे मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता'