पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझे लोक इथेच आहेत म्हणत हॉलिवूडच्या अनेक ऑफर नाकारणार अभिनेता

इऱफान खान

अनेक बॉलिवूड कलाकारांना हॉलिवूडमध्येही काम करायचं असतं, बॉलिवूडमधल्या काही मोजक्या कलाकारांना ही संधी मिळाली देखील. काहींच्या दारात अशी संधी एकदा नाही तर अनेकदा चालून  आल्या. या कलाकारांपैकी इरफान खान एक होते. ज्युरासिक वर्ल्ड, लाइफ ऑफ पायमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. मात्र काही चित्रपटाच्यांच्या ऑफर त्यांनी स्वत:हून नाकारल्या होत्या.

२०१६ साली हिंदुस्थान टाइम्स ब्रंचला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले होते. मला कधीही भारत सोडून जावसं वाटलं नाही. मला अनेक चांगल्या ऑफर्स आल्यात. जर मी तरुण असतो तर कदाचित या ऑफर्सचा विचारही केला असता. मात्र आता मला माझा देश कधीही सोडून जावासा वाटत नाही. माझे लोक इथेच आहेत आता लहान चित्रपटच भारतीय सिनेमाची व्याख्या बदलत आहेत, आणि या बदलाचा सहभाग होण्याचं भाग्य मला लाभलं यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानतो असंही इरफान खान म्हणाले होते. 

चित्रपटसृष्टीने मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला- मुख्यमंत्री

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांच्या एका चित्रपटासाठी इरफान खान यांना विचारण्यात आलं होतं मात्र चित्रपटात भूमिकाला फारसा वाव नसल्याचं सांगत त्यांनी ही संधी नाकारली होती. ख्रिस्तोफर नोलन यांच्या चित्रपटाचीही ऑफर त्यांना आली होती. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांना काही महिने अमेरिकेत राहणं गरजेचं होतं. त्यावेळी द लंचबॉक्स आणि डी दे या दोन चित्रपटांचं चित्रीकरण इरफान करत होते, अशावेळी वेळापत्रक जुळून येत नव्हतं, त्यामुळे या चित्रपटालाही त्यांना नकार द्यावा लागला.

चारच दिवसांपूर्वी इरफान खान यांच्या आईचे झाले होते निधन

त्यानंतरही हॉलिवूडमधल्या एका दिग्दर्शकाकडून दोनदा त्यांना ऑफर आल्या होत्या, यावेळीही वेळापत्रक जुळून आलं नसल्यानं त्यांना नकार द्यावा लागला होता.