पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फत्तेशिकस्त'ला 'मराठा लाइट इन्फंट्री'मध्ये मानाचे स्थान

फत्तेशिकस्त

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'फत्तेशिकस्त' या चित्रपटाचा समावेश 'मराठा लाइट इन्फंट्री'मध्ये करण्यात आला आहे. भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. या रेजिमेंटच्या अर्काइव्हमध्ये 'फत्तेशिकस्त' या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट त्यांच्या  अभ्यासक्रमाचा भाग असणार आहे.  असा मान मिळवणारा 'फत्तेशिकस्त' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

बिग बी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज शब्द नाही तर मंत्र आहेत

गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहितील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार फत्तेशिकस्तमध्ये आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. जगभरातील मराठी चित्रपटांच्या चाहत्यांनी या चित्रपटाला दाद दिली.

दीपिकाचा '८३' मधला पहिला लूक प्रदर्शित

या चित्रपटाचा समावेश अभ्यासक्रमाचा भाग म्हणून करण्यात आला आहे यावर चित्रपटाच्या कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. ही अतिशय मानाची बाब असल्याचंही कलाकारांनी म्हटलं आहे.