पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मौनीनं सोडला नवाजचा चित्रपट, निर्मात्यांवर ठेवला अव्यावहारिकपणाचा ठपका

बोले चुडिया

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मौनी रॉय हिनं अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकीच्या  ‘बोले चुडिया’ चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. तिनं चित्रपटाच्या निर्मात्यांवर अव्यावहारिकपणाचा ठपका ठेवला आहे. तर दुसरीकडे  मौनी हीच  अव्यावहारिक आणि बेजबाबदार अभिनेत्री असल्याचा आरोप निर्मात्यांनी केला आहे. गेल्याच आठवड्यात ‘बोले चुडिया’चं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शमास सिद्दीकी करणार आहे. मात्र पोस्टर प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला नाही  तोच निर्माते आणि अभिनेत्रीमध्ये सुरू असलेलं भांडण समोर आलं आहे. 

‘बोले चुडिया’ चे निर्माते राजेश भाटिया यांनी मौनी रायवर बेजबाबदार अभिनेत्री असल्याचा  ठपका ठेवला आहे. तर दुसरीकडे निर्मात्यांच्या अव्यवाहारिक वागण्याला कंटाळूच मौनीनं चित्रपट सोडला असल्याचं तिच्या प्रवक्तांचं म्हणणं आहे.

' या चित्रपटासाठी आम्ही मोठी रक्कम गुंतवली आहे. आम्ही एखाद्याला समजावून कामाप्रती प्रामाणिक आणि जबाबदार राहण्यास सांगत असू तर आमचं यात काहीही चुकलं नाही. मात्र हेच बोलणं एखाद्याला बोचत असेन तर आम्ही यात काहीच करू शकत नाही चित्रपट व्यवसाय हा छंद नसून ती एक जबाबदारी आहे.' असं निर्माते राजेश भाटिया  पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

'मौनी  ही मन  लावून काम करायची नाही तिचा अव्यवाहिरकपणा आणि बेजबाबदार वागणं सर्वांनाच खटकत होतं. त्याचप्रमाणे सेटवर वावरताना अनेकदा तिचा राग अनावर व्हायचा, असंदेखील भाटीया म्हणाले. 

मौनी रॉय ही टेलिव्हिज विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. निर्मात्यांनी केलेले सर्व आरोप मौनीच्या प्रवक्त्यांनी खोडून काढले आहे. 

मौनीनं अजूनही करारपत्रावर सह्या केल्या नव्हत्या. या करारपत्रामध्ये ताळमेळ नसलेल्या काही अजब अटी होत्या. मौनी ही अत्यंत जबाबदार अभिनेत्री आहे मात्र चित्रपटाचे निर्माते हे स्वत: अव्यावहारिक असून त्यांचा अव्यावहारिकपणा सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे ईमेल आणि मेसेज आहेत. मात्र मौनीला कोणावरही चिखलफेक करायची नाही असं तिच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.