पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला

अभिनेत्री मोनी रॉय

मुंबई मेट्रोच्या जुहू येथील बांधकाम परिसरात अभिनेत्री मोनी रॉयच्या गाडीवर मोठा दगड कोसळला, यात गाडीचं नुकसान झालं आहे मात्र सुदैवानं  कोणीही  जखमी झालेलं नाही. 

हिंदी भाषा लादणं चुकीचं : रजनीकांत

मोनी रॉय ही आपल्या आगमी चित्रपट ‘मेड इन चायना’च्या ट्रेलर लाँचसाठी निघाली होती त्यावेळी हा अपघात घडला. मोनीनं या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जुहू सिग्नलजवळ गाडी थांबली असताना अकराव्या मजल्यावर मोठा दगड गाडीवर कोसळला. जर एखादा व्यक्तीच्या अंगावर हा दगड कोसळला असता तर मोठी दुर्घटना झाली असती’ असं मोनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मुंबई मेट्रोच्या या बेजबाबदार वागण्यावर काय करता येईल? असा संतप्त सवालही तिनं विचारला आहे. 

'भूल भुलैया २' मध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत

मल्लिका शेरावत म्हणते, मुलांची जबाबदारी नको रे बाबा

मोनीच्या गाडीचं यात नुकसान झालं आहे. या संबधीची तक्रार पोलिसात करण्याचा सल्लाही मोनीला अनेक ट्विटर युजर्सनं दिला आहे.