पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले अमेय खोपकर आणि मनसेचे आभार

तान्हाजी द अनसंग वॉरिअर

स्वराज्याचे सुभेदार  आणि कोंढाणा स्वराज्यात परत मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तान्हाजी  मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पहायला  मिळणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे. हा  चित्रपट मराठीतही डब होणार आहे. हिंदी चित्रपट मराठीत डब करून प्रदर्शित करण्याला नेहमीच मनसेनं आक्षेप घेतला आहे. मात्र हा चित्रपट मराठीच नव्हे तर अन्य भाषांमध्येही प्रदर्शित व्हावा अशी इच्छा मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी व्यक्त केली आहे. 

'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांचा धमकीवजा इशारा

'शिवरायांचे आठवावे रूप|
शिवरायांचा आठवावा प्रताप|
हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध आहेच परंतु 'तान्हाजी' हा सिनेमा जगभरातल्या भाषांत डब करून प्रदर्शित व्हावा. यानिमित्ताने आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहिल.' अशी पोस्ट खोपकर यांनी सोशल मीडियावर लिहिली आहे.  

अभिनेता अजय देवगननं यासाठी अमेय खोपकर आणि मनसेचे आभार मानले आहेत.

'तान्हाजी..' चित्रपटात अजय देवगन तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे. शरद केळकर  हा शिवाजी महाराजांची, सैफ अली खान उदयभानची आणि काजोल सावित्रीबाईंची भूमिका साकारत आहे.  ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. 

पंकज उधास पहिल्यांदाच मराठीत गाणार भावगीत