कोल्हापूर आणि सांगलीकरांची पुरामुळे अवस्था बिकट आहे. देशभरातून मदतीचा ओघ येत आहे. मराठी कलाकारांनी देखील पूरग्रस्तांना मदत केली. मात्र महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणाऱ्या बॉलिवूड कलाकारांनी का मदत केली नाही?, असा सवाल मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी उपस्थित केला आहे.
समस्त मराठी कलाकारांनी पूरग्रस्तांसाठी दाखवलेली आपुलकी आणि मनाचा मोठेपणा बघून सगळेच भारावले पण एक गोष्ट खूप त्रास देतेये, महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतीमधून सांगणारे बॉलिवूड कलाकार संकटकाळात कुठे आहेत? ज्या प्रेक्षकांच्या जीवावर बक्कळ कमाई करतात असे प्रेक्षक दु:खात असताना त्यांना सावरण्यासाठी बॉलिवूड कलाकार का पुढे आले नाहीत? असा सवाल खोपकर यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.
अमोल कोल्हे निर्मित मालिकांचे एका दिवसाचे मानधन पूरग्रस्तांना देणार
"समस्त मराठी कलाकारांनी दाखवलेली आपुलकी बघून सगळेच भारावलेत, पण... महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे असं मुलाखतींमधून सांगणारे ते बाॅलीवूड कलाकार या संकटकाळात कुठे आहेत ? असो, आम्ही आमच्या मातीतल्या मायेच्या माणसांसाठी सदैव झटत राहू." - @MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/HhZYEROcuS
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 12, 2019
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकार सरसावले
या कलाकारांना मदतीच्या आवाहनाचा एकही व्हिडिओ का पोस्ट करावासा वाटला नाही? असाही खरमरीत सवाल त्यांनी विचारला आहे. पाऊस आणि पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मोठं नुकसानं झालं आहे. या पुरामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत, कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. पुराचे पाणी ओसरले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत अशावेळी बॉलिवूड कलाकारांनी केलेल्या दुर्लक्षावर बोट ठेवत खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमांतून कलाकारांना प्रश्न विचारला आहे.