पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुटेल एवढं ताणू नका, चित्रपटगृह मालकांना मनसेचा पुन्हा इशारा

चित्रपटगृह मालकांना मनसेचा  पुन्हा इशारा

बॉलिवूड चित्रपटांमुळे पुन्हा एकदा मराठी चित्रपटांना घर घर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठीतले दोन मोठे चित्रपट २४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहेत. मात्र बॉलिवूड चित्रपटांमुळे या चित्रपटांना चित्रपटगृहच उपलब्ध होत नाहीये.  जर चित्रपटगृह मालकांनी 'हिरकणी' आणि 'ट्रिपल सीट' या चित्रपटांना चित्रपटगृह दिलं नाही तर साहेबांच्या भाषेत सांगावं लागेल असा, इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी  दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अमेय खोपकर यांचं चित्रपटगृह मालकांना लिहिलेलं पत्र शेअर केलं आहे. 

'पाब्लो एस्कोबार' येणार भारतात

'''हिरकणी' आणि 'ट्रिपल सीट' प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांचा अथक प्रयत्न चालू आहे. पण चित्रपटगृह उपलब्ध नाही असे ठोकळेबाज उत्तर प्रत्येक ठिकाणी मिळत आहे. पण मग बाकी निर्मात्यांनी काय करायचे? कुठे जायचे? ही अशी मोनोपोली जर हिंदी निर्माते करणार असतील तर मराठी निर्मात्यांनी काय करायचे?”, महाराष्ट्रातच मराठीची ही गळचेपी का होत आहे? याला जबाबदार असणाऱ्या अनेक घटकांपैकी तुम्ही एक आहात '' असं खोपकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे. 

''येणाऱ्या सर्व चित्रपटांना संधी देणं हे तुमचं कर्तव्य आहे. तुमची चित्रपटगृहे हिंदीची बटीक नाहीत. तुम्ही म्हणाल की हा आमचा प्रश्न आहे. आम्ही जे हवे ते करु…मग नीट ऐका. महाराष्ट्राची अस्मिता जपणे आणि मराठी चित्रपटांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा आमचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही जे हवे ते करु. आम्ही समंजस आहोत, सहनशील आहोत म्हणजे दुर्बल आहोत याचा असा गैरसमज तुम्ही करुन घेतला असेल तर तो चुकीचा आहे, कदाचित साहेबांच्या भाषेत सांगितलं तर जास्त पटेल'' असे खडे बोलही सुनावले आहेत. 

प्रकृतीत सुधारणा, बिग बी पुन्हा 'केबीसी'च्या सेटवर

“स्वत: जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. त्यात दोघांचेही हित आहे. आणि या दोन्ही भाषा तुम्हाला समजत नसतील तर मग आम्हाला आमच्या खास भाषेत तुम्हाला समजवावं लागेल. तेव्हा तुटेल एवढे ताणू नका,” अशा इशारा मनसेनं दिला आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mns Amey Khopkar write open letter to movie theatre owner for not giving screen to marathi movie Hirkani triple seat