पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हिरकणी'साठी मनसेचा पुन्हा 'खळखट्याक'चा इशारा

हिरकणी चित्रपट

मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यात अडचणी येत असल्याने मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.  येत्या २४ ऑक्टोबरला अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' चित्रपट आणि संकेत पावसे दिग्दर्शित 'ट्रिपल सीट' हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याच वेळी बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ४' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या दोन्ही मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळवण्यात अडचणी येत आहेत. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळाली नसतील तर काचा फुटणार असा इशारा मनसेने दिला आहे.

पुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृह मिळवण्यासाठी भांडावे लागत आहे. त्यामुळे मनसेला पुन्हा आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे. गुरुवारी मनसेचे कार्यकर्ते हिरकरणी चित्रपटाला चित्रपटगृह मिळावे यासाठी चित्रपटगृहाच्या मालकांची भेट घेणार आहे. जर या चित्रपटांना प्रदर्शनासाठी स्क्रिन मिळाल्या नाही तर मनसे पुन्हा खळखट्याक करेल, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

विक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर डंपरला अपघात; मोठी वाहतूक

दरम्यान, 'मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवण्यासाठी भांडावे लागत असेल तर ही गोष्ट खूप चुकीची आहे. ऐतिहासिक विषय घेऊन मराठीमध्ये हिरकणीसारखा  चित्रपट येत आहे. त्यामुळे त्याला स्क्रीन्स मिळायलाच हव्यात. लहानपणापासून ती कथा ऐकत आलोय. त्यामुळे अशा चित्रपटांसाठी महाराष्ट्रात चित्रपटगृह मिळणार नसतील तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मग खळखट्याक' करूनच थिएटर मालकांचे डोळे उघडणार असतील तर ते करू, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तासांसाठी बंद