अभिनेता करण जोहरच्या पार्टीतला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वादात सापडला आहे. व्हिडीओत दिसणारे दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी हे अमली पदार्थांच्या नशेत होते असा आरोप अकाली दलाचे आमदार मंजिदर सिरसा यांनी केला. या कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी सिरसा यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्याचप्रमाणे कलाकारांनी उत्तेजकद्रव्य चाचणी करावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.
'बॉलिवूड पार्टींमध्ये अमली पदार्थांचं सेवन होतंच'
मंजिदर सिरसा यांनी ट्विट करत बेकायदापणे अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एन.डी.पी.एस कायदा १९८५ च्या अंतर्गत सर्व कलाकारांवर एफआयआर दाखल करावी अशी मागणी केली आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
I have requested @CPMumbaiPolice to register FIR against the Bollywood Stars in the video flaunting their drug party...under The Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985
— Manjinder S Sirsa (@mssirsa) August 1, 2019
The party was uploaded by @karanjohar himself on July 28th, 2019@ANI @htTweets @republic @ZeeNews pic.twitter.com/nNRH6i9yfn
अभिनेत्रीच्या भेटीचं आमिष दाखवून चाहत्याला ६० लाखांचा गंडा
मंजिदर सिरसा यांच्या आरोपांवर अद्यापही कोणत्याही कलाकारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी कलाकारांची पाठराखण करत सिरसा यांना फटकारलं आहे. माझी पत्नी त्या पार्टीत उपस्थित होती तिथे कोणीही उत्तेजक पदार्थांचं सेवन केलं नाही असं मिलिंद देवरा म्हणाले.