पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकार नशेत, आमदाराचा आरोप

बॉलिवूड कलाकार

काही दिवसांपूर्वी अभिनेता करण जोहरनं एका पार्टीतील व्हिडीओ शेअर केला होता. यात दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या व्हिडीओत दिसणारे सर्व कलाकार हे अमली पदार्थांच्या नशेत होते असा आरोप अकाली दलाचे आमदार  मंजिदर सिरसा यांनी केला आहे.  

सनीचा मोबाइल नंबर समजून दिल्लीस्थित तरुणाला फोन करून केलं हैराण

सिरसा यांनी कलाकारांचा पार्टीतील व्हिडीओ शेअर करत सर्व कलाकार हे अमली पदार्थांच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे. हा 'उडता बॉलिवूड' असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. काही वर्षांपूर्वी अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या पंजाबमधील तरूणांवर 'उडता पंजाब' हा चित्रपट आला होता. यावरून मोठा वादही झाला होता. पंजाबमधील अनेक नेत्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला होता. 

अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या या कलाकारांविरोधात मी आवाज उठवत आहे असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या पार्टीत सहभागी झालेले करण जोहर, दीपिका पादुकोन, वरुण धवन, विकी कौशल सर्व कलाकार नशेत होते असा दावा त्यांनी केला. मात्र काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मंजिदर सिरसा यांना ट्विटवर चांगलेच फटकारले आहे.

..म्हणून गोविंदानं नाकारली 'अवतार' चित्रपटाची ऑफर

या पार्टीत माझी पत्नीदेखील उपस्थित होती. कोणीही अमली पदार्थांच्या नशेत नव्हतं. त्यामुळे खोट्या अफवा पसरवून कोणाचीही प्रतिमा मलिन करू नका, मंजिदर सिरसा यांनी सर्व कलाकारांची बिनशर्त माफी मागावी, असंही मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.