पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘सेक्रेड गेम्स २’ वादाच्या भोवऱ्यात; हे आहेत गंभीर आरोप

सैफ अली खान

'नेटफ्लिक्स'ची बहुचर्चित आणि तितकीच वादग्रस्त वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. बॉलिवूड सुपरस्टार सैफ अली खानच्या भूमिकेमुळे ही वेब सीरीज वादामध्ये सापडली आहे. दिल्लीचे आमदार मंजिदर सिंह सिरला यांनी सेक्रेड गेम्स या वेबसीरीजवर जोरदार टीका केली आहे.

सेक्रेड गेम्स या वेबसीरीजमध्ये सैफ अली खानने सरदारची भूमिका साकारली आहे. ज्यामध्ये त्याचे नाव सरताज असे आहे. सैफ या वेबसीरीजमध्ये हातात घातलेला कडा काढून समुद्रात फेकून देतो. यावरुनच हा वाद झाला आहे. सैफ अली खानच्या या सीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत मंजिदर सिंह सिरसा यांनी दिग्दर्शक अनुराग कश्यप यावर निशाणा साधला आहे.

याप्रकरणी दिल्लीचे राजोरी गार्डन विधानसभा मतदार संघाचे आमदार मंजिदर सिंह सिरसा यांनी वेबसीरीजमधील हा सीन ताबडतोब काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसंच त्यांनी धमकी देखील दिली आहे. जर असे झाले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. सिरसा यांनी सांगितले की, 'शीख धर्मामध्ये कडा घालणे ही धार्मिक परंपरा आहे. अशामध्ये त्याला काढून फेकणे हा धर्माचा अपमान आहे. त्यामुळे या सीनला काढून टाकावे.

सिरसा यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 'मला आश्चर्य वाटते की बॉलिवूड शीख धर्माचा अपमान का करत आहे? अनुराग कश्यप याने मुद्दाम सेक्रेड गेम्समध्ये हा सीन ठेवला आहे. हा कोणताही सामान्य दागिना नाही, तो शीखांचा अभिमान आणि गुरु साहिब यांचा आशिर्वाद आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, जर आपण शीख समुदायावर संशोधन करू शकत नाही तर मग या वेबसीरीजमध्ये मुख्य पात्र शीख का ठेवले? ताबडतोब हा सीन काढून टाकण्यात यावा नाहीतर प्रोडक्शन टीमवर कायदेशीर कारवाई करु.'