पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

बॉलिवूड कलाकार

दिग्दर्शक करण जोहरनं शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरू आहे. या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्व कलाकारांनी अमली पदार्थांचं सेवन केलं होतं, असा आरोप अकाली दलाचे आमदार  मंजिदर सिरसा यांनी केला होता. या व्हिडीओत दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. हे सर्व कलाकार अमली पदार्थांच्या नशेत होते असा आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. यावरून अनेक नेटकऱ्यांनी सिरसा यांना फटकारलं यात काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचाही समावेश होता.  मात्र आता सिरसा यांनी पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करावी अशी मागणी केली आहे. 

सनीचा मोबाइल नंबर समजून दिल्लीस्थित तरुणाला फोन करून केलं हैराण

सिरसा यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत  सर्व कलाकार हे अमली पदार्थांच्या नशेत असल्याचा आरोप केला.  हा 'उडता बॉलिवूड' असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता. अमली पदार्थांच्या नशेत असलेल्या या कलाकारांविरोधात मी आवाज उठवत आहे असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. करण जोहर, दीपिका पादुकोन, वरुण धवन, विकी कौशल सर्व कलाकार नशेत होते असा आरोप त्यांनी केल्यानंतर त्यांना अनेकांनी ट्विटरवर फटकारलं. 

त्यानंतर नवं ट्विट करत कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. हे सर्व कलाकार आहेत, त्यांना  फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कलाकार असल्यानं अनेक गोष्टींचा लाभ ते घेतात. मात्र त्यांचीही एक जबाबदारी आहे त्यानं प्रत्येक भारतीयांना उत्तर दिलंच पाहिजे, असं सिरसा यांनी नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.