पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय, प्रभास आणि जॉनमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर अटळ

अक्षय प्रभास

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करून अधिक नफा  कमवायचा हे गणित बॉलिवूडमध्ये पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्यानं चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतो. म्हणून ऐनवेळी निर्माते,  वितरक यावर तडजोड करून काहीना काही मार्ग काढतात. मात्र १५ ऑगस्टला  बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. 

बॉक्स ऑफिस टक्कर : २०२० मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट

अक्षय, प्रभास आणि जॉन या तिन्ही स्टार्सचे चित्रपट हे एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार आहेत हे पक्क झालं आहे. या आठवड्यात अक्षयनं त्याच्या 'मिशन मंगल' चित्रपटाचं पहिलं पोस्टर जाहीर केलं. हा चित्रपट १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार आहे. तर दुसरीकडे जॉननंही 'बाटला हाऊस' हा १५ ऑगस्टलाच प्रदर्शित होणार असं म्हटलं आहे.  याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा 'साहो' हा चित्रपटदेखील हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत  प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपट आहे. विशेष म्हणजे यात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहेत. 

वाढदिवशी रणवीरची चाहत्यांना खास भेट

'बाटला हाऊस' आणि 'मिशन मंगल' हे दोन्ही सत्य घटनांवर आधारित आहेत. तर प्रभासच्या 'साहो' मध्ये एकापेक्षा एक अॅक्शन दृश्यांचा समावेश असणार आहे तेव्हा  प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला जास्त पसंती देतात हे पाहण्यासारखं ठरेन.