पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या ‘बाटला हाऊस’ आणि 'मिशन मंगल'ची कमाई

अक्षय कुमार

‘बाटला हाऊस’ आणि 'मिशन मंगल' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्टला प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेपासून प्रेरित आहेत.  जॉन अब्राहम हा  ‘बाटला हाऊस’मध्ये प्रमुख भूमिकेत आहे तर अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू हे 'मिशन मंगल'मध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं  चित्रपटाच्या कमाईवर परिणाम  होईल अशी भीती  अनेक चित्रपट व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केली होती. मात्र या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 

‘सेक्रेड गेम्स २’ ऑनलाइन लीक

‘बाटला हाऊस’ने पहिल्या दिवशी १४.५९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २००८ साली दिल्लीतील बाटला हाऊस चकमक प्रकरणावर ‘बाटला हाऊस’ चित्रपट आधारलेला आहे.  या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम एसीपी संजय कुमार या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. 

बिग बॉस मराठी : किशोरीताईंनी शिवला बांधली राखी

तर दुसरीकडे 'मिशन मंगल'नंही  चांगली कमाई केली आहे. ‘मिशन मंगल’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी २९.१६ कोटी रुपयांची कमाई केली. अक्षय कुमारचा हा पहिल्याच दिवशी सर्वाधित कमाई करणारा  चित्रपट देखील ठरला आहे.