पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयचा 'मिशन मंगल' महाराष्ट्रात टॅक्स फ्री

मिशन मंगल

 अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नूसह अनेक बॉलिवूड कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. नुकतीच या संदर्भातली घोषणा करण्यात आली.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी नागराज मंजुळेंची ५ लाखांची मदत

 'मिशन मंगल' हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, शरमन जोशी, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारीसह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारलेला आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेवर हा चित्रपट आधारला आहे.

बिग बॉस मराठी : या कारणासाठी परागचा आहे किशोरीताईंनाच पाठिंबा

या चित्रपटानं दोन आठवड्यात १६८. ४८ कोटींची कमाई भारतात केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. भारताच्या मंगळयान मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी दिलेलं योगदान चित्रपटात अधोरेखित करण्यात आलं आहे.