पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मिशन मंगल'ची ५० कोटींच्या दिशेनं झेप

मिशन मंगल

अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांची  प्रमुख भूमिका असलेला  'मिशन मंगल' चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे या चित्रपटाची ५० कोटींच्या दिशेनं झेप सुरू झाली आहे. या चित्रपटानं एकूण ४६.४४ कोटींची कमाई केली आहे. 

'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये अक्षयला सर्वाधिक प्रसिद्धी का? सोनाक्षीनं दिलं उत्तर

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी २९.१६ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं १७.२८  कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत हा चित्रपट ८५ कोटींची कमाई करेन असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. 

'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'

या चित्रपटासमोर जॉनच्या ' बाटला हाऊस'चं आव्हान होतं. मात्र कमाईच्या बाबतीत 'मिशन मंगल'नं ' बाटला हाऊस'ला मागे टाकलं आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मोहन, क्रिती कुल्हारी, शरमन जोशी यांची प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. भारताची मंगळयान मोहीम, या मोहिमेसाठी महिला वैज्ञानिकांनी घेतलेली मेहनत यावर हा चित्रपट आधारलेला आहे.