पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस'ची बक्कळ कमाई

मिशन मंगल- बाटला हाऊस

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाले. या चित्रपटानं अकरा दिवसांत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामाई केली आहे. अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांची  प्रमुख भूमिका असलेला  'मिशन मंगल'  चित्रपटानं ११ दिवसांत १५० कोटी कमावले आहेत. तर बाटला हाऊसची १०० कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.

..तर पाकिस्तानातही जाऊन परफॉर्म करेन- शिल्पा शिंदे

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार 'बाटला हाऊस'नं एकूण ८३.७८ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यात  चित्रपटानं ६५. ८४ कोटींची कमाई केली तर दुसऱ्या आठवड्यात १७.९४ कोटींची कमाई चित्रपटानं केली आहे. 

ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'

'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट  एकाच दिवशी प्रदर्शित झाले.  'बाटला हाऊस' मध्ये जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहे. तर 'मिशन मंगल'मध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मोहन, क्रिती कुल्हारी, शरमन जोशी यांची प्रमुख भूमिका  आहे. हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानं दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम होईल असं म्हटलं जात होतं, मात्र दोन्ही  चित्रपटानं चांगली कमाई केली  आहे.