पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला 'मिस युनिव्हर्स २०१९'चा किताब

मिस युनिव्हर्स २०१९

अमेरिकेच्या अटलांटा येथे पार पडलेल्या ६८ व्या 'मिस युनिव्हर्स २०१९' या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिनं  बाजी मारली आहे.  तिनं मिस युनिव्हर्स २०१९' च्या किताबावर आपलं नाव कोरलं आहे. 'मिस युनिव्हर्स' चा किताब पटकावणारी ती  तिसरी दक्षिण आफ्रिकी सौंदर्यवती  ठरली आहे. यापूर्वी १९७८ आणि २०१७ मध्ये हा किताब दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं जिंकला होता. 

आई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

जोजिबिनी २०१९ मध्ये मिस साऊथ आफ्रिका हा किताब जिंकली होती. जगभरातील ९० सौंदर्यवतींनी  स्पर्धेत सहभाग घेतला होता. या  ९० सौंदर्यवतींना शह देत जोजिबिनी या किताबावर आपलं नाव कोरलं आहे.  मिस युनिव्हर्स स्पर्धेत वर्तिका सिंगनं भारताचं प्रतिनिधित्त्व केलं होतं.  

२८ दिवसांनंतर लतादीदींना डिस्चार्ज, त्यांनीच दिली घरी आल्याची माहिती