पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिदची पत्नी मिरा राजपूत सुरू करणार शाकाहारी रेस्तराँ?

मिरा राजपूत

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी आता हॉटेलिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवण्याच्या विचारात आहे. मिरानं महाविद्यालयात शिकत असताना शाहिदशी लग्न केलं. या जोडप्याला  दोन मुलं देखील आहेत. मिरा आता लवकरच रेस्तराँ सुरु करण्याच्या विचारात असल्याचं वृत्त मुंबई मिररनं दिलं आहे. 

पुण्यात स्टंट चित्रीत करताना मोठ्या अपघातातून बचावला वरुण धवन

मिरा पूर्णपणे शाकाहारी रेस्तराँ सुरू करणार आहे. यासाठी वांद्रे- जुहूच्या उच्चभ्रु वस्तीमध्ये तिनं रेस्तराँसाठी जागा शोधायलाही सुरूवात केली असल्याचं समजत आहे. काही दिवसांपूर्वी ती रेस्तराँसाठी लज्जदार पदार्थ तयार करणाऱ्या शेफच्याही शोधात असल्याचंही समजत होतं. 

बिग बॉस १३ चं चित्रीकरण लांबणार, सलमानला मिळणार सर्वाधिक मानधन

मिरा पतीप्रमाणे बॉलिवूडमध्ये करिअर घडवेल असं म्हटलं जात होतं. तिनं एका जाहिरातीतही काम केलं होतं.  अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावरही ती झळकली होती. मात्र बॉलिवूडमध्ये न येता तिनं वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Mira Rajput is inclined towards the restaurant business already begun hunting for a space