हिंदी कलर्स वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्या प्रकरणी वाहिनीस प्रसारण मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. येत्या १५ दिवसांत आपली बाजू मांडण्यासाठी मंत्रालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्
ही मालिका वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार दरम्यान प्रदर्शित होते. मालिकेत महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचा आरोप मालिकेवर आहे. या मालिकेत काही तथ्यांची छेडछाड करण्यात आली आहे तसेच भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Ministry of Information and Broadcasting issues a showcause notice to Colors TV over distortion of facts in television series “Ram Siya ke Luv Kush”; asks it to appear within 15 days pic.twitter.com/hlZGZz5PCX
— ANI (@ANI) September 13, 2019
अभिनेत्री रवीना टंडन होणार आजी
त्याचप्रमाणे श्रीराम आणि लव- कुश यांच्या भेटीचेही चुकीचे चित्रण मालिकेत करण्यात आलं आहे असंही कारणे दाखवा नोटीशीत म्हटलं आहे. १५ दिवसांत उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाई केली जाईन असाही इशारा वाहिनीस देण्यात आला आहे.