पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस १३' प्रकरणावर माहिती व प्रसारण मंत्रालयाची नजर

बिग बॉस १३

बिग बॉस कार्यक्रम  बंद करण्यात यावा अशी मागणी करणारं पत्र गाझियाबादमधील भाजपचे आमदार नंदकिशोर गुज्जर यांनी लिहिलं. आता या प्रकरणात माहिती व प्रसारण मंत्रालय लक्ष घालणार  असल्याचं समजत आहे. 

४० वर्षांनी कमबॅक केलेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

बिग बॉस कार्यक्रम अश्लील असून, कुटुंबासोबत बसून हा कार्यक्रम बघणे शक्य नाही. त्यामुळे तो तातडीने बंद करण्यात यावा, अशी मागणी गुज्जर यांनी पत्रातून केली होती. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर  यांनी गुज्जर यांनी पत्र लिहून बिग बॉस प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. या पत्राची दखल घेत बिग बॉस १३ वर माहिती व प्रसारण मंत्रालय लक्ष ठेवणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

... आणि त्या दृश्यामुळे रेखा यांना ओशाळल्यागत झालं होतं

बिग बॉस हा कार्यक्रम देशाच्या संस्कृतीविरोधात आहे. यामधील काही दृश्य़े ही पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अश्लील आहेत.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला परत एकदा गतवैभव मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे देशाचे नाव बदनाम केले जात आहे, असं गुज्जर यांनी आपल्या पत्रात लिहिले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ministry of Information and Broadcasting is looking into the complaint against Big Boss 13