पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : ८१ वर्षांच्या मिलिंद सोमणच्या आईचा हा आहे फिटनेस फंडा

उषा सोमण

 मिलिंद सोमणच्या आई उषा सोमणही फिटनेससाठी तितक्याच प्रसिद्ध आहेत. ८१ वर्षांच्या उषा यांची व्यायामाप्रतीची आवड ही तरुणाईला लाजवेल अशीच आहे. नुकताच मिलिंदनं त्याच्या आईसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ८१ वर्षांच्या उषा या दोरीउड्या मारताना दिसत आहेत.

'दोरी उड्या मारणं हा प्रकार तिच्यासाठी नवा  नाही, मात्र माझ्यासाठी तो नवा आहे. लॉकडाउनमध्ये तुम्ही एकमेकांना नव्या गोष्टी शिकवाव्यात, जोपर्यंत तुम्ही तरुण आहात असा विचार करता तोपर्यंत म्हातारपण तुमच्या मनाला शिवतही नाही', असं लिहित मिलिंदनं आईसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.

साडीतही मिलिंदच्या आई अगदी न अडखळता दोरीउड्या मारताना दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.