पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आणि बँकॉकवरून येताना "गोष्ट एका पैठणीची"चे संवाद पाठच करून आले 'इनामदार'

मिलिंद गुणाजी

'गोष्ट एका पैठणीची'  या चित्रपटात अभिनेता मिलिंद गुणाजीदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर  यांच्यासह मिलिंद गुणाजींची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटात मिलिंद गुणाजी  'इनामदार' ही भूमिका साकारत आहे. 

बॉलिवूड, हॉलिवूड विसरा, येतोय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित 'झॉलिवूड'

 बायकोवर मनापासून प्रेम करणारा, तिच्या आदेशाने सगळी कामं करणारा, प्रेम करणारा खानदानी असं हे इनामदार पात्र आहे.  'या भूमिकेसाठी  मिलिंद गुणाजी यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय अचूक आहे. त्यांनी आवाज, उंची, अभिनयाच्या जोरावर या भूमिकेला न्याय दिला आहे. तसंच त्यांचं शिस्तबद्ध वागणंही प्रेरणादायी आहे', असं निर्माता अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितलं. या चित्रपटाला होकार दिल्यानंतर  मिलिंद गुणाजी यांच्या  शिस्तीचा किस्साही समोर आला आहे. 

बलात्कार, लैंगिक शोषणाच्या आरोपात प्रसिद्ध हॉलिवूड निर्माता दोषी

मिलिंद गुणाजी यांनी चित्रीकरणापूर्वी चित्रपटाची संहिता मागवून घेतली होती मात्र त्यांना दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बँकॉकला जायचं होतं. त्या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यावर ते ठरल्यानुसार गोष्ट एका पैठणीच्या सेटवर दाखल झाले. आश्चर्य म्हणजे ते चित्रीकरण संपल्यानंतर 'गोष्ट एका पैठणीची' मधले त्यांचे सर्व संवाद ते तोंडपाठ करून आले होते. त्यांच्या शिस्तबद्ध वागण्याने सर्वजण थक्क झाले.