पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Met Gala 2019 : रेड कार्पेटवर प्रियांका- दीपिकाचा जलवा!

मेट गाला २०१९

मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या मेट गाला Met Gala 2019 इव्हेंटमध्ये तारे- तारकांचा जलवा पाहायला मिळाला. न्यूयॉर्कच्या मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्टमध्ये संपन्न होत असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कॉस्टयूम पार्टीकडे सगळ्यांच्याच नजरा लागून  आहेत. जगभरातील  फॅशन विश्वातील मंडळींचं मेट गालाच्या  कार्पेटवर येणाऱ्या तारा तारेकांच्या फॅशन सेन्सकडे लक्ष आहे.  अर्थात भारतीय चाहत्यांचं लक्ष प्रियांका चोप्रा आणि दीपिका  पादुकोन यांच्याकडे आहे.  

प्रियांका आणि निकचं हे  मेट गाला इव्हेंटमधलं तिसरं वर्ष.  २०१७ मध्ये पहिल्यांदाचा ही जोडी मेट गालाच्या  कार्पेटवर दिसली होती. तिथुनच या दोघांच्या प्रेमाला सुरूवात झाली. आता निकशी विवाहबंधनात अडकल्यानंतर पहिल्यांदा ही जोडी एकत्र कार्पेटवर अवतरली. गेल्या दोन वर्षांत मेट गालाच्या कार्पेटवर आपल्या फॅशन सेन्सनं लक्ष वेधून घेणाऱ्या प्रियांकानं यावेळी हटके लूक ट्राय केला. प्रसिद्ध कादंबरी 'अॅलिस इन वंडरलँड'मधल्या रेड क्वीन या खलनायिकेपासून तिचा हा लूक प्रेरित होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

तर निक इटालियन माफिया लूकमध्ये प्रियांकासोबत आला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Met 2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


विशेष म्हणजे प्रियांकाच्या  टिकलीनं सर्वांच लक्ष वेधलं. ही टिकली माझी ओळख आहे. पाश्चिमात्य संस्कृती आणि माझ्या संस्कृतीशी सांगड घालण्याचा प्रयत्न मी केला आहे असं प्रियांका म्हणाली. 

यावर्षीची मेट गालाची थिम आहे ' Camp: Notes on Fashion' . या इव्हेंटमध्ये बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोननंही उपस्थिती लावली.

दीपिकाचा लूक काहीसा बार्बी डॉलच्या जवळ जाणारा होता. Zac Posen फॅशन डिझायनरनं दीपिकासाठी खास हा लूक डिझाइन केला होता. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Met Gala 2019 Bollywood stars Priyanka Chopra and Deepika Padukone attended the event in New York