पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या जेएनयू भेटीवर 'छपाक'च्या दिग्दर्शिका मेघना म्हणतात...

मेघना- दीपिका

अभिनेत्री दीपिका पादुकोननं गेल्या आठवड्यात जेएनयूत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विद्यार्थ्यांची भेट हा दीपिकाच्या चित्रपट प्रमोशनचा एक भाग होता अशी टिका तिच्यावर करण्यात आली. याचा  फटका तिच्या 'छपाक' चित्रपटालाही बसलेला पहायला मिळत आहे. तिच्या जेएनयू भेटीवर पहिल्यांदाच दिग्दर्शिका मेघना गुलजारनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

'अनन्या'मधून 'फुलपाखरु' फेम ऋता करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

खासगी आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या व्यक्तीनं खासगी आयुष्यात काय केलंय आणि त्याच व्यक्तीनं चित्रपटात काय काम केलंय या दोन गोष्टींकडे भिन्नपणे पहायला हवं, असं मेघना म्हणाल्या.  हा चित्रपट आम्ही तयार केला यामागे आमचा उद्देश होता. त्या उद्देशाकडे आपण पहायला हवं, असंही मेघना म्हणाली. 

बॉक्स ऑफिस कलेक्शन स्पष्ट; तान्हाजी खूप पुढे, छपाक खूप मागे

 'छपाक' हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात दीपिका लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारत आहे.