पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुबेहूब अक्षय सारखा दिसणारा सुनील गावस्करांचा चाहता पाहिलात का?

हुबेहूब अक्षय सारखा दिसणारा चाहता

सध्या माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्करांचा काश्मिरी चाहता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. माजिद मीर हा सुनील गावस्करांचा चाहता असल्यामुळे त्याला गावकरी 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखतात. गावस्करांसारखी कॅप परिधान करून माजिद मीर गावात वावरताना दिसतात. मात्र ते 'लिटिल मास्टर' दिसण्यापेक्षा अभिनेता अक्षय कुमारसारखे अधिक दिसतात असं बहुतांश चाहत्यांना वाटत आहे.

शाहिद- मीरा राहणार वरळीच्या आलिशान घरात?
 

Met a Kashmiri Fan of Sunil Gavasker, Majid Mir in #Kashmir Wears that hat everyday religiously 👍🏻👍🏻 pic.twitter.com/jNcHx5GJSK

एका पत्रकारानं माजिद मीरसोबतचे फोटो शेअर केले. या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माजिदला गावकरी सुनील गावस्कर म्हणत असले तरी त्याचं दिसणं हे हुबेहूब बॉलिवूड स्टार अक्षय कुमार सारखं आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.

Photos : घरात शिवानीच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

यापूर्वी अमिताभ बच्चन, अनुष्का शर्मा, शाहरुख, प्रियांका चोप्रा, या कलाकारांसारखे हुबेहूब दिसणारे चेहरे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.