पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चित्रपटाला भरपूर यश मिळू दे, आमिरकडून 'पानिपत'च्या टीमला शुभेच्छा

आमिर खान

या आठवड्यात बॉलिवूडमधला मोठा चित्रपट 'पानिपत'  प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला अभिनेता आमिर खाननं भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आमिरनं ट्विट करून चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर आणि संपूर्ण टीमला यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर हा चित्रपट आधारलेला आहे. या चित्रपटात  अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ पेशवे, क्रिती सॅनॉन पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. ६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाला भरपूर यश मिळावं असं म्हणत आमिरनं आशुतोष गोवारिकर, क्रिती सॅनॉन आणि अर्जुन कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपिकाला साकारायचीये 'देसी सुपरवुमन'

या चित्रपटाचा बुधवारी खास प्रेस शो आयोजित करण्यात आला होता. या प्रेस शोसाठी अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील हा चित्रपट सर्वांनी आवर्जुन पहा असा संदेश आपल्या ट्विटरमध्ये लिहिला आहे. 

मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटकेपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पाहावेच लागेल. फक्त प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानातील प्रत्येकाने माझ्या मित्र आशुतोष गोवारीकर याचा चित्रपट पाहायला हवा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. 

हृतिकचा समावेश 'आशियातील रुबाबदार व्यक्तीं'च्या यादीत