गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. बॉलिवूडसह अनेक सेलिब्रिटींनी लतादीदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील लतादीदींना अनोख्या पध्दतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने ट्विटरवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांने जुन्या आठवणी सांगत लतादीदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच लतादीदींनी त्याला दिलेल्या एका खास गिफ्टचा उल्लेख त्याने या व्हिडीओमध्ये केला आहे.
Wishing @mangeshkarlata didi a very very Happy 90th birthday. May God bless you with the best of health and happiness. pic.twitter.com/AEWObUacuC
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 28, 2019
अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल; पवार कुटुंबियांमध्ये चर्चा सुरु
सचिन तेंडुकरने १ मिनटं २५ सेकंदाचा हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करत लतादीदींना टॅग केला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन तेंडुलकरने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने असे म्हटले आहे की, 'मला आठवत नाही की मी तुमचं पहिलं गाणं कधी, कुठे आणि कसे ऐकलं. मी एक गोष्ट ऐकली आहे, जेव्हा मूल आईच्या पोटात असते तेव्हा ते सर्व काही ऐकते. कदाचित मी सुध्दा तेव्हाच तुमचं गाणं ऐकलं असावं. माझ्या आयुष्यातला असा कोणताच दिवशी नाही की मी तुमचं गाणं ऐकलं नाही.'
शरद पवार मुंबईतील निवासस्थानी दाखल; अजित पवारांची घेणार
सचिन पुढे सांगतो की, 'तुम्ही माझ्यासाठी एक खास गाणं गायलं होतं. 'तू जहा-जहा चलेगा मेरा साया साथ होगा.' फक्त हे गाणंच नाही तर तुम्ही माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले आणि आशीर्वाद सुध्दा दिले. हे मी कधीही विसरू शकत नाही. या गाण्याचे शब्द तुम्ही तुमच्या हस्ताक्षरामध्ये लिहले होते. ते फ्रेम करुन मला गिफ्ट म्हणून दिले. ते माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. या गिफ्टपेक्षा देवाने आम्हाला सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे ते म्हणजे तुम्ही. मी देवाकडे प्रार्थना करतो की, तुम्हाला नेहमी आनंदी आणि सुरक्षित ठेव.'