पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कुली नंबर १' च्या सेटला आग, सुदैवानं जीवितहानी नाही

कुली नंबर १ च्या सेटला आग

सारा अली खान- वरुण धवनच्या 'कुली नंबर १' च्या सेटला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून आग लागली असताना सुदैवानं सेटवर कोणीही उपस्थित नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली. 

अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्

मुंबई मिररच्या वृत्तानुसार गोरेगावमधल्या फिल्मीस्थान स्टुडिओत मध्यरात्री ही आग लागली. सेटवर सारा आणि वरुण दोघंही उपस्थित नव्हते. मात्र जवळपास १५ कामगार सेट परिसरात उपस्थित होते. अग्नीशमन दलानं ही आग पूर्णपणे विझवली आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

अभिनेत्री रवीना टंडन होणार आजी

'कुली नंबर १' हा १९९५ साली प्रदर्शित झालेल्या  गोविंदा- करिश्माच्या 'कुली नंबर १' चा रिमेक आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं होतं. रिमेकचं दिग्दर्शनही डेव्हिड धवनच करणार आहेत. २०२० मध्ये १ मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.