पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'मर्दानी'वर 'जुमांजी' भारी

'मर्दानी'वर 'जुमांजी' भारी

अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. अन्यायाविरोधात लढणाऱ्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या धाडसाची ही कथा आहे. तर याचदिवशी 'जुमांजी-  द नेक्स्ट लेव्हल' हा फँटसी अॅक्शन हॉलिवूडपटही प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे भारतीय प्रेक्षकांसाठी इंग्रजीबरोबरच हिंदीतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 'मर्दानी २' पेक्षाही अधिक कमाई केली आहे. 

सलमानच्या घरी बॉम्ब, १६ वर्षांचा मुलानं पोलिसांना दिली खोटी माहिती

बॉक्स ऑफिस इंडियाच्या वृत्तानुसार 'मर्दानी २' चित्रपटानं ३.२५ कोटींची कमाई पहिल्या दिवशी केली तर जुमांजीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन याहून अधिक होतं.  'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल' नं एकूण ५ कोटींची कमाई केली. राणीचा 'मर्दानी २' आणि 'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'  या दोन्ही चित्रपटांनी समीक्षकांची चांगलीच प्रशंसा मिळवली. 

पुण्यतिथी विशेष : '....जगण्याचं टायमिंग मात्र थोडंस चुकलं'

गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमधले अनेक चित्रपट भारतात इंग्रजीबरोबरच हिंदी, तामिळ, तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यामुळे हे चित्रपट आता भारतीय चित्रपटांना चांगलीच टक्कर देताना  पाहायला मिळत आहे.