पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजोबांच्या वेशात वावरणाऱ्या या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

रोहिणी हट्टंगडी

दिवसभर सोशल मीडियावर एकाच फोटोची  चर्चा आहे. कारण या फोटोत दिसणारे आजोबा हे कोणी अभिनेते नसून चित्रपटसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. मात्र या अभिनेत्रीला ओळखणं जवळपास अवघड आहे. एका स्त्रीला पुरुष साकारायचा होता पण ते पडद्यावरचं नाटक नव्हतं तर ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे मोठं आव्हान होतं आणि ते साकारण्यासाठी कसदार अभिनेत्री हवी होती. अखेर एकमुखानं ज्येष्ठ  अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचं नाव सुचवण्यात आलं. त्यामुळे या फोटोत दिसणारे आजोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी या पुरुषांच्या वेशात वावरत आहेत हे एव्हाना तुमच्याही लक्षात आलं असेनच. 

मलायकानं अखेर अर्जुनसोबतचं नातं केलं मान्य

मराठी चित्रपट ‘Once मोअर’ मध्ये त्या आजोबांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी रोहिणीताईंनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज फोटोतील गेटअपवरून सहज येतो. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला रोहिणीताई न्याय देऊ शकतील हा विचार करून दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी रोहिणीताईंना या भूमिकेची आवश्यकता समजावून सांगितली. भूमिकेचं आव्हान व त्यातील वेगळेपणा लक्षात घेत रोहिणीताईंनी या भूमिकेला होकार दिला.

अभिनेत्री केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्याला अटक

कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये गेटअप करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी ‘Once मोअर’ या चित्रपटासाठी रोहिणीताईंना मेकअप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेकअपच्या सहाय्याने रोहिणी यांना आजोबांचं रूप दिलं आहे. या मेकअपसाठी रमेश आणि कमलेश यांच्या जोडीने रोहिणीताईंनीही खूप मेहनत घेतली आहे. चित्रीकरणाच्या पाच तास आधी रोहिणीताईंना मेकअप करण्याची प्रक्रिया सुरू व्हायची. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर दोन तास मेकअप काढण्यासाठी लागायचा. या काळात त्या काहीही खाऊ शकत नव्हत्या.

सुनैनाचा प्रियकर विवाहित असल्यानं रोशन कुटुंबियांचा विरोध?

आजोबांच्या गेटअपमध्ये रोहिणीताईंना केवळ अभिनय, संवादफेक करायची नव्हती, तर त्यात धावण्यापासून अॅक्शन सीन्सपर्यंत बऱ्याच गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे या वयात रोहिणीताईंनी स्वीकारलेलं आजोबांच्या भूमिकेचं आव्हान आणि त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच कौतुकास्पद आहे. दिग्दर्शकावर दाखविलेला विश्वासही त्यांच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेत असल्याचं मत चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर व्यक्त करतात. आजवरच्या करियरमधील ही नावीन्यपूर्ण आणि आव्हानात्मक  भूमिका साकारण्याची संधी ‘Once मोअर’ या सिनेमामुळे मिळाल्याचं सांगत रोहिणीताई म्हणतात की, ‘मला नेहमीच आव्हानं स्वीकारायला आवडतात. हे आव्हान मी स्वीकारणं धाडसाचं होतं पण यातही एक आनंद होता. त्यामुळेच पाच तासांची मेकअप प्रोसेस आणि गेटअपमध्ये अॅक्शन करणं हे देखील मी एन्जॅाय केलं. प्रेक्षकांनाही माझं हे रूप नक्कीच आवडेल’ अशी अपेक्षा रोहिणीताईंनी व्यक्त केली. हा चित्रपट १ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.