पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीतही हळहळ

सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.  राजकारणच नाही तर कला, क्रीडाक्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांचे भावस्पर्शी ट्विट

तुमची उणीव फक्त भाजपलाच नाही तर प्रत्येक भारतीयाला जाणवेल असं  अभिनेता सुबोध भावे  यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

रितेश देखमुख,सिद्धार्थ जाधवनंही स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. छातीमध्ये दुखत असल्यामुळे त्यांना साडेनऊ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:marathi stars including subodh bhave Siddharth Jadhav paid tributes to Former External Affairs Minister Sushma Swaraj