पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवीची रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीनं घेतली कित्येक दिवसांची मेहनत

अभिनेत्री तेजस्विनी पंडित

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीची विविध रुपे साकारण्याची आगळीवेगळी संकल्पना अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं प्रत्यक्षात उतरवली. गेल्यावर्षी तिनं साकारलेली 'नवदुर्गा' प्रेक्षकांना भावली. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, महागौरी अशा विविध रुपात ती दिसली, मात्र यावर्षी जगद्जननीच्या आणखी काही रुपांत तेजस्विनी दिसणार आहे.

'दयाबेन' करणार 'तारक मेहता...'मध्ये कमबॅक, निर्माते सकारात्मक

 नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत तेजस्विनी 'कोल्हापूरची अंबाबाई' आणि 'कामाख्या' अशा आदीशक्तीच्या दोन रुपांत दिसली. तिनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या या दोन्ही रुपांत एक संदेश होता. समाजातील काही प्रश्न तिनं या रुपातून मांडले. ''हेच प्रश्न पुढचे नऊ दिवस मी देवीच्या विविध रुपांतून समाजापुढे मांडणार आहे'', असं ती मराठी हिंदुस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात म्हणाली. ''या प्रत्येक पोस्टमध्ये समाजातील काही गंभीर समस्येवर मी भाष्य केलं आहे. या समस्येवर उत्तरंही आपल्याकडे आहेत, प्रत्येकानं याचा विचार केला तर नक्कीच या समस्यांशी आपण लढा देऊ शकतो'', असं तेजस्विनी म्हणाली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

प्रतिपदा "कोल्हापूरची अंबाबाई " . . याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी...माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी... पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू... कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू...म्हणून सावरू शकले नाही तुला... पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार... मी बहरायचं नाही सोडणार मी बहरायचं नाही सोडणार . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

 गेल्या काही महिन्यांपासून तेजस्विनी या संकल्पनेवर काम करत आहे. ''ही मूळ संकल्पना माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या जवळच्या मित्राची आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येकजण नवरंगात ढळतो. नवरंगातले विविध फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो. मात्र मला सर्वांहून वेगळं काहीतरी करायचं  होतं. मला गर्दीत हरवायचं नव्हतं आणि यातूनच  नवदुर्गेची संकल्पना मनात आली. गतवर्षांत देवीच्या  विविध रुपांत मी दिसले. अनपेक्षितरित्या भरघोस प्रतिसाद त्याला लाभला. साहजिक लोकांच्या अपेक्षा वाढल्या. गेल्यावर्षीनंतर लगेचच यावर्षी कोणती संकल्पना असेल यावर काम करायला मी सुरूवात केली'',  असं तेजस्विनीनं सांगितलं. 

'या' हॉलिवूडपटात श्रृती मराठेसह अनेक मराठी कलाकारांचा भरणा

गेल्या अडीच महिन्यांपासून तेजस्विनी याची तयारी करत आहे. ''केवळ चेहऱ्याचा मेकअप करण्यास  दीड, दोन तास लागतात मग पुढचा मेकअप सुरू होतो. मेकअप झाल्यानंतर लगेच छायाचित्रणास सुरूवात होते. मेकअपसाठी विविध रंग वापरले आहेत, या रंगांचा थोडा परिणाम त्वचेवर झाला. मात्र संकल्पनेवर काम करणं  हे मनाला खरंच समाधान देणारं होतं'' असा आनंद तिनं व्यक्त केला. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

द्वितीय " कामाख्या " . . वेद , पुराण आणि संस्कृतीचा आपला देश... प्रत्येक नव्या जीवाची निर्मिती होते योनी मधून आणि म्हणूनच माझ्या या रूपात माझ्या योनीची पूजा होते. वेद सांगतात स्त्री प्रमाणे नदीही रजस्व संस्कारा नंतर जीवनाची (पाण्याची ) नवनिर्मिती करते तेंव्हा त्या काळात तिला स्पर्श करणं टाळावे. जिथे नदीला देखील अश्या प्रमाणे सन्मान देण्याची रीत आहे तिथेच प्रत्येक वर्षी ३०,००० हून अधिक शीलांचं हनन होतंय, ज्या योनीची पूजा व्हावी तिच्यावर निर्घृण वार केले जातात हे कसं सहन करू मी ? दुधाचे दात देखील न आलेल्या माझ्या लेकी वासनेला बळी पडतात तेंव्हा त्यासाठी कुणाला जवाबदार ठरवू मी ? . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

नवरात्रोत्सवाच्या काळात तेजस्विनी मुंबादेवी, जरीमरी माता, माँ शेरावाली, तुळजाभवानी, गावदेवी अशा देवीच्या विविध रुपात दिसणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:marathi star tejaswini pandit create awareness on social issues with her navratri 2019 special concept