पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नटसम्राटा'ला सिने- नाट्यसृष्टीतून श्रद्धांजली

डॉ. श्रीराम लागू

मराठी रंगभूमीवरीला अनभिषिक्त 'नटसम्राट' डॉ. श्रीराम लागूंचे  वयाच्या ९२ व्या वर्षी पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. 'पिंजरा', 'सिंहासन', 'सामना', 'मुक्ता' यांसारखे चित्रपट तर 'नटसम्राट', 'मित्र, 'जगन्नाथाचा रथ', 'सुंदर मी होणार' सारख्या अनेक नाटकांत त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. मराठी चित्रपटसृष्टीतील कित्येक कलाकारांसाठी आदर्शस्थानी असलेल्या लागूंच्या निधनानंतर सिने- नाट्यसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शरीराने जरी आमच्यात नसलात तरी तुमच्या स्मृती नेहमीच आमच्या सोबत असतील- सुबोध भावे

एक पर्व संपलं,पण विचार नाही- सुमित राघवन 

असं म्हणत अभिनेता सुमित राघवन यांनी श्रीराम लागूंना श्रद्धांजली वाहिली आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर या चित्रपटात सुमीत राघवनन डॉ. लागूंची भूमिका साकारली होती.

आत्मकथा मिटली..- सोनाली कुलकर्णी  

नटसम्राट हरपला-  सोनाली कुलकर्णी 

आपण महान कलाकार गमावला, नेत्यांनी नटसम्राटाला वाहिली श्रद्धांजली