पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: माणूसपण जपणारा उत्त्म कलाकार श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे

मराठी चित्रपट-मालिका-नाट्यसृष्टीतला चॉकलेटबॉय, देखणा लोभस चेहरा लाभलेला सहज सुंदर अभिनेता, "श्रेयस तळपदे"चा आज (२७ जानेवारी) वाढदिवस. घरातूनच अभिनयाचे धडे मिळालेल्या श्रेयसने "ऑल द बेस्ट" आणि "थ्रि चिअर्स" या दोन नाटकांमधे आपल्या अप्रतिम अभिनयाची चमक दाखवली आणि हा कलाकार फक्त मराठीच नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवणार आहे हे स्पष्ट झालं होतं. 

Happy Birthday : कलंदर कलाकार जितेंद्र जोशी

दामिनी, आभाळमाया या मराठी मालिका गाजवल्यानंतर नागेश कुकनूर यांच्या, "इक्बाल" या हिंदी चित्रपटात त्याला इक्बाल या मुक्या नायकाची भूमिका मिळाली. काहीही न बोलता येणारा हा इक्बाल आपल्या उत्तम देहबोलीतून खूप काही बोलून गेला आणि त्याने समीक्षकांचीही भरभरुन दाद मिळवली. मग श्रेयासचा प्रवास दुप्पट वेगाने सुरू झाला. हाती आलेल्या प्रत्येक संधीचं तो सोनं करत गेला. त्यासाठी अपार कष्ट आणि भूमिकांचा उत्तम अभ्यास तो करत गेला. सतत हसतमुख आणि मदत करायला सदैव तयार असल्याने प्रत्येकाला तो आपलेसं करून घेतो. 

बॉक्स ऑफिसवर 'अक्षय कुमार' विरुद्ध 'अक्षय कुमार' टक्कर टळली

उत्कृष्ठ अभिनेता आणि सच्चा माणूस असलेल्या श्रेयसने एकापाठोपाठ हिंदी आणि मराठी चित्रपट गाजवले आणि लाखो तरुणींच्या स्वप्नातला तो राजकुमार बनला. पछाडलेला, सावरखेड एक गांव, निदान, आई शप्पथ, बाजी, अगर, अपना सपना मनी मनी, बॉम्बे टू बँकॉक, डोर, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 2, गोलमाल 3, हाऊसफुल्ल 2, एंटरटेनमेंट, ग्रेट ग्रँड मस्ती, ओम शांती ओम असे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट त्याने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने गाजवले. 

आमिरच्या विनंतीवरून अक्षयचा 'बच्चन पांडे'संदर्भात मोठा निर्णय

सनई चौघडे आणि पोष्टर बॉईज या चित्रपटांची निर्मितीही त्याने केली होती. या चित्रपटांनी मराठी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तर, पोष्टर बॉईजच्या हिंदी आवृत्तीचं उत्तम दिग्दर्शनही त्याने केलं होतं. इक्बालमधील कामासाठी त्याला फिल्मफेअर आणि झी सिने क्रिटिक्स हे पुरस्कार मिळाले. तर, डोर चित्रपटासाठी त्याला स्टार स्क्रीनचा बेस्ट कॉमेडियन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओम शांती ओम चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्याला, स्टारडस्ट ब्रेकथ्रू परफॉर्मन्स पुरस्काराने गौरविण्यात आलं. अशा या हिंदीत गाजत असलेल्या मराठमोळ्या उत्कृष्ट अभिनेत्याला आणि माणूसपण जपणाऱ्या उत्तम माणसाला वाढदिवसाच्या आणि पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू