पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday: मराठीतला 'हँडसम हंक' अंकुश चौधरी

अंकुश शिंदे

मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीमधला खराखुरा स्टाईल आयकॉन असलेला 'हँडसम हंक' अंकुश चौधरी याचा आज (३१ जानेवारी) वाढदिवस. मुंबईवर मनापासून प्रेम करणाऱ्या या अप्रतिम कलाकाराला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने शाळेत असतानाच तो नाटकांमध्ये काम करत होता. तेव्हा त्याला क्रिकेटही खूप आवडत होतं. देशासाठी क्रिकेट खेळावं असं त्याचं स्वप्न होतं. आजही त्याला क्रिकेट आवडतंच. त्यामुळे सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धेत तो हिरहिरीने उतरतो आणि आपलं क्रिकेटचं कौशल्य आजमावतो. इतर ठिकाणी समोरच्या माणसाची फिरकी घेऊन त्याची विकेट काढणारा हा उंचापुरा फिरकीपटू, आपल्या उत्तम फिरकीने भल्याभल्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवतो.

'गंगूबाई काठीयावाडी' मध्ये DID मधल्या या डान्सरची वर्णी?

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर केदार शिंदेमुळे, शाहीर साबळे यांच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' या लोककला ग्रुपशी त्याची जवळून ओळख झाली. लोककलेच्या सादरीकरणात तो आनंदाने सहभागी झाला. नेमकं नाचायला शिकला. याचा उपयोग त्याला पुढे चित्रपटांमध्ये आणि "एकापेक्षा एक" या नृत्याच्या कार्यक्रमात उत्तम पद्धतीने करता आला.

VIDEO: अक्षय कुमारच्या 'अतरंगी रे'चा टीझर प्रदर्शित

अभिनयाची आवड असल्याने एमडी कॉलेजमध्ये गेल्यावरसुद्धा त्याने अनेक एकांकिका स्पर्धा आपल्या सहज सुंदर अभिनयाने गाजवल्या. 'प्लँचेट' ही एकांकिका गाजवल्यानंतर पुढच्या वर्षीच, "ऑल द बेस्ट" एकांकिका आली आणि त्याचं नशीबच पालटलं. या एकांकिकेचा प्रयोग महेश मांजरेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी पाहिला. त्यांनी नाट्यनिर्माते मोहन वाघ यांना सांगितलं की, 'याचं उत्तम व्यावसायिक नाटक होईल.' पुढे नाटकाने इतिहास घडवला. त्यातली आंधळ्याची भूमिका म्हणजे त्याची व्यावसायिक रंगभूमीवरील पहिली भूमिका. त्यानंतर आमच्यासारखे आम्हीच, अधांतर, डोळे मिटून उघड उघड, तू तू मी मी अशा अनेक नाटकांमधे त्याने आपल्या उत्तम अभिनयाने रसिकांच्या मनावर गारुड केलं. "गोपाळा रे गोपाळा" नाटकातली त्याची भूमिका विशेष स्पृहणीय अशी होती. "हसा चकट फु", "बेधुंद मनाची लहरी", "आभाळमाया" या लोकप्रिय मालिकांमध्येही त्याने आपल्या लाजवाब अभिनयाने रसिकांची मनं जिंकली. 'सुना येती घरा' ह्या चित्रपटाद्वारे त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आणि सावरखेड एक गांव, आईशप्पथ, मातीच्या चुली, यंदा कर्तव्य आहे, झक्कास, डबल सीट, माझा नवरा तुझी बायको, इश्य, चेकमेट, गैर, लालबाग परळ, प्रतिबिंब, टार्गेट, उलाढाल, यांचा काही नेम नाही, ब्लफ मास्टर, दगडी चाळ, अनुराग, गुरु, देवा, क्लासमेट, संशयकल्लोळ, ट्रिपल सीट, धुराळा अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्याने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. 

सायली संजीवसोबत शशांक केतकर सांगणार 'गोष्ट एका पैठणीची'

या आघाडीच्या नायकाने रिंगा रिंगा आणि पोरबाजार या चित्रपटांमधे उत्तम खलनायकी भूमिकाही रंगवल्या आणि रसिकांची कौतुकाची थापही मिळवली. "दुनियादारी" मधला 'डिएसपी' म्हणजेच दिग्या अजूनही रसिकांच्या मनात घर करून आहे. जत्रा आणि अगंबाई अरेच्चा ह्या चित्रपटांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर त्याने, "साडे माडे तीन" या लोकप्रिय चित्रपटाचं 'सचित पाटील'बरोबर दिग्दर्शन केलं. तर, "नो एन्ट्री, पुढे धोका आहे" या सुप्रसिद्ध चित्रपटाचंही त्याने उत्तम दिग्दर्शन केलं. अशा या लाघवी स्वभावाच्या, मितभाषी, माणुसकी जपणाऱ्या सच्च्या कलाकाराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

#नाट्यकर्मीविजू