पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलींच्या विश्वात नेणाऱ्या बहुचर्चित 'गर्ल्स'चा ट्रेलर लाँच

गर्ल्स

मराठीमधला बहुचर्चित असा 'गर्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 'गर्ल्स' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल होतं.  

'लाल सिंग चड्ढा'मधला आमिरचा लूक व्हायरल

मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. 'दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो'. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

आयुष्मानच्या 'बाला'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई

'बॉईज' आणि 'बॉईज २' सारख्या चित्रपटातून रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे  दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी 'गर्ल्स'मधून मुलींच्या खासगी आणि बंदिस्त आयुष्याला सर्वांसमोर आणले आहे. या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत.  येत्या २९ नोव्हेंबरला  'गर्ल्स' चित्रपट  प्रदर्शित होत आहे.