पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'फत्तेशिकस्त'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, जाणून घ्या कमाई

फत्तेशिकस्त

गनिमी कावा हे युद्धतंत्र शिवाजी महाराजांनी जगाला दिले. आणीबाणीच्या प्रसंगात ते योग्य ती कल्पकता वापरीत आणि शत्रूचे कपट, फसवणूक, गुप्त कारस्थानांना हाणून पाडत. शाहिस्तेखानावरील हल्ला म्हणजे शिवशाहितील सर्जिकल स्ट्राइकच! याच सर्जिकल स्ट्राइकचा थरार ‘फत्तेशिकस्त’’ चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतो. या चित्रपटाला मराठी रसिकप्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला. पहिल्या तिनं दिवसांत चित्रपटानं ३.५ कोटींची कमाई केली. 

तान्हाजी मालुसरेंच्या साहसाचा आधारस्तंभ सावित्रीबाईंच्या भूमिकेत काजोल

पहिल्या दिवशी चित्रपटानं ६५ लाख, दुसऱ्या दिवशी १.१७ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १.६८ कोटींचा गल्ला जमवला.  पहिल्या तीन दिवसांत ३.५ कोटींची बक्कळ कमाई चित्रपटानं केली आहे. विशेष म्हणजे 'बाला', 'मरजावा' सारखे बॉलिवूड चित्रपटही याच महिन्यात प्रदर्शित झाले होते. 
अफझलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून ते बाहेर पडण्यात यशस्वी झाले, पण शाहिस्तेखानाचे संकट उभे राहिले. शाहिस्तेखानाच्या  धुमाकूळात स्वराज्यातील रयत भरडून निघत होती. महाराजांनी आपल्या विश्वासू मंडळींबरोबर विचारविनिमय करून योजना पक्की केली. रामनवमीच्या आदल्या दिवशी अर्थात चैत्र शुद्ध अष्टमीला लालमहालावर हल्ला करण्याचे निश्चित ठरले. १ लाख मुघल सैन्याविरोधात आपले ९० विश्वासू शिलेदार घेवून महाराजांनी जगाच्या इतिहासातील उत्कृष्ट लष्करी कारवाई फत्ते केली त्याचा रोमांचकारी अनुभव ‘फत्तेशिकस्त चित्रपटातून अनुभवायला मिळतो. 

रानू यांच्या मेकओव्हरचं अनेक नेटकऱ्यांकडून समर्थन

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, मृण्मयी देशपांडे, अंकित मोहन, निखिल राऊत, हरीश दुधाडे,  समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, रुची सावर्ण, अश्विनी कुलकर्णी  नक्षत्रा मेढेकर, प्रसाद लिमये, अमोल हिंगे, ऋषी सक्सेना, सिद्धार्थ झाडबुके, सायली जोशी जाधव, अदिती भास्कर, सचिन गवळी, गणेश तिडके, राजेश अहेर, अक्षय शिंदे यासोबत हिंदीतला प्रसिद्ध चेहरा अनुप सोनी यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात आहे. 

सत श्री अकाल जी, लाल सिंह चड्ढा आलाय भेटीला