पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन

बाबा चित्रपट

ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी चित्रपटाची निवड ‘गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस’च्या ‘हॉलीवूड फिल्म प्रेस असोशिएशन मेम्बर्स (एचएफपीए)’ साठी झाली आहे.

दीपक दोब्रीयाल यांच्या अत्यंत प्रतिभावान अशा अभिनयाने नटलेल्या आणि तेवढ्याच प्रतिभाशाली अशा नंदीता पाटकर व बालकलाकार आर्यन मेंघजी यांचा अभिनय असलेला या चित्रपटाची जागतिक पातळीवर प्रशंसा होतेय याचा आनंद ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ आरती सुभेदार यांनी व्यक्त केला. 

क्रिकेटर इरफान - हरभजन करणार चित्रपटात काम

राज गुप्ता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या नामांकनाची आता आम्हाला प्रतीक्षा असल्याचंही आरती सुभेदार यांनी सांगितलं.  ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ’गोल्डन ग्लोब्ज’च्या नामांकनांच्या यादीत चित्रपट प्रवेश करील, अशी आमची पूर्ण खात्री आहे, असा विश्वास अशोक सुभेदार यांनी व्यक्त केला आहे. 

दत्तक घेतलेल्या मुलीचा सनीनं थाटामाटात केला वाढदिवस साजरा

“बाबा’ हा मला खूपच प्रिय असलेला एक चित्रपट आहे. चित्रपटाची कथा पहिल्यांदा मला ऐकवली गेली, तेव्हापासून तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा चित्रपट आहे. अशाप्रकारच्या चित्रपटामध्ये काम करणे हे कोणत्याही कलाकारासाठी एक मोठी गोष्ट असते आणि या चित्रपटातील माधवची भूमिका करण्याची संधी मला मिळाली याचा मला मनस्वी आनंद आहे.”, अशा शब्दात मुख्य अभिनेता दीपक दोब्रीयाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या कोयना मित्राचा सलमानवर आरोप