पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पाहा, थरकाप उडवणाऱ्या ‘काळ’चा ट्रेलर

काळ ट्रेलर

दिग्दर्शक डी संदीप यांचा बहुप्रतीक्षित हॉरर मराठी चित्रपट 'काळ'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी वाट चोखाळणारा हॉरर चित्रपट म्हणून ‘काळ’कडे पाहिले जात असताना त्याच्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढविली आहे. या ट्रेलरमधून युवकांचा एक गट काही अद्भुत आणि अगम्य अशा गोष्टींच्या शोधात असताना कुठल्यातरी गूढ संकटात सापडल्याचे स्पष्टपणे समोर येते. 

मराठा समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल अक्षय कुमारविरोधात तक्रार

कोकणातील आडोशाच्या एका बंगल्यात रात्रीच्या किर्र अंधारात या युवकांची झोप गूढ अशा घटनांमुळे उडून जाते. एरव्ही गूढ आणि अद्भुत अशा गोष्टींची उकल करण्यात वाकबगार असल्याच्या फुशारक्या करणारे हे तरुण त्यांच्यावर तशी वेळ आली की मात्र घाबरून जातात. ‘एकदा तुम्ही आत आलात की बाहेरचे रस्ते बंद’ असे शब्द ट्रेलरमध्ये पडद्यावर उमटतात आणि प्रेक्षकांमध्येही घबराट पसरते.

‘काळ’ संपूर्ण महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

मराठी प्रेक्षकांसाठी नववर्षांत गश्मीर- पूजाचा 'बोनस'