पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता 'सिनियर सिटीझन' रुपेरी पडद्यावर

सिनियर सिटीझन

मराठीमध्ये येत्या काही महिन्यांत अनेक चित्रपट येत आहेत. यातला एक म्हणजेच 'सिनियर सिटीझन' होय. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. 

'रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर' यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या अजय फणसेकर यांनी "सिनियर सिटीझन" हा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

चार वर्षांनी ‘डॅडी’ दगडी चाळीत

पाठमोरी उभी असलेली सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लूक आहे. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं रंजक कथानक या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया, किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. मात्र इतर काही महत्त्वपूर्ण चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.  त्यांची नाव अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहेत. 

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते... 

लवकरच महत्त्वाच्या भूमिकांवरून पडदा उठणार आहे, त्यामुळे या चित्रपटात कोणता नवा विषय प्रेक्षकांच्या समोर येतोय हे पाहण्यासारखं ठरणार आहे.