पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फत्तेशिकस्त : १५ नोव्हेंबरला रक्ताची रंगपंचमी

फत्तेशिकस्त

छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र दिना'चं औचित्य साधत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी  'फत्तेशिकस्त' चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता तमाम मराठी प्रेक्षकांना होती. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज  या चित्रपटात आहे. यातील बहुतांश कलाकार हे 'फर्जंद' चित्रपटातही पहायला मिळाले होते. ‘फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर स्वराज्याच्या इतिहासातलं आणखी एक सोनेरी पान उलगडणार आहे. 'पुरे झालं बुद्धिबळ,  आता रक्ताची रंगपंचमी. थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा' असं आपल्या फेसबुक पोस्टवर लिहित चिन्मय मांडलेकर यानं चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राईक्स असंही या चित्रपटाला म्हटलं आहे.  अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

मलायका-अर्जुन पुन्हा सुट्टीवर

महाराजांचा गनिमीकावा आणि कालसुसंगत युद्धनीतीच्या कथा आपण इतिहासात ऐकल्या, वाचल्या आहेत. ही शत्रूला नमोहरण करून सोडणारी, शत्रूच्या गोटात घुसून मारणारी शिवरायांची ही युद्धनिती 'फत्तेशिकस्त' चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.