पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Happy Birthday : कधी पडद्यावरची खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आई

सुहासिनी देशपांडे

नावाप्रमाणेच सतत हसतमुख असणारी मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील उत्तम अभिनेत्री, सुहासिनी देशपांडे. सुरुवातीच्या काळात पडद्यावर मुख्य नायिकेच्या मागे नृत्य करत असतानाच, डोळयात आपणही एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचं स्वप्न बघून, मोठ्या जिद्दीने त्यांनी आपल्या कारकिर्दीला नवं सुरेख वळण दिलं आणि थोड्याच कालावधीत त्यांनी उत्तम 'अभिनेत्री' म्हणून आपलं स्वतःचं असं निराळं स्थान निर्माण केलं.

Happy Birthday: आवाजाचा जादूगार, जबरदस्त प्रतिभेचा अभिनेता

 'कथा अकलेच्या कांद्याची', 'राजकारण गेलं चुलीत', 'चिरंजीव आईस', 'कुलकर्ण्याचं स्थळ', 'मंगळसुत्र' आणि 'सासुबाईंचं असंच असतं' अशा अनेक नाटकांमधून. तर, 'आई शप्पथ!', 'आज झाले मुक्त मी', 'आम्ही दोघे राजा राणी', 'गडबड घोटाळा', 'धग', 'मानाचं कुंकू', 'हिरवा चुडा सुवासिनीचा', 'माहेरची साडी' अशा अनेक मराठी, तर, 'कथा', 'वक्त के पहले', 'सिंघम' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या लाजवाब अभिनयाने कधी खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत रसिकांच्या मनात घर केले. अशा या ज्येष्ठ अभिनेत्रीला, म्हणजेच सुहासिनी देशपांडे यांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Death Anniversary: विनय आपटे नावाच्या झंझावाताची गोष्ट